कळस ( प्रतिनिधी ) धार्मिक व भागवत धर्मचा प्रसार व किर्तन,प्रवचन या द्वारे कळस गावचे नाव लौकिकास नेणारे ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांना "कळस वारकरी भूषण २०२४" पुरस्कार समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
तरुण वारकरी यांना संप्रदायचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उपक्रम स्तुत्य असून त्याचा फायदा नवीन पिढी भक्ती मार्गात येईल.- हभप निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर
कळस बू ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ, कळसेश्वर भजनी मंडळ यांचे वतीने जिल्हा परिषद चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाने व सरपंच राजेंद्र गवांदे व माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला. श्री. अरुण महाराज शिर्के यांची घरची अतिशय गरीब परिस्थिती आहे.आई बिड्या बांधण्याचे काम करित असे, यातून ते उदरनिर्वाह करीत असतात.वडील तमासगीर होते. पण ते नंतर वारकरी संप्रदाया कडे ओढले गेले. वडिलांच्या संस्कारातून त्यांना धार्मिक कार्याची गोडी लागली. त्या काळात आळंदी येथे शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, मात्र मधुकरी मागून जोग वारकरी शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण पूर्ण केले. संगीत विशारद पदवी प्राप्त केले.आज महाराष्ट्र भर किर्तना च्या माध्यमातून कळस गावच नाव उज्वल केले बद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.
जन्मभूमीत सन्मान होण हे भाग्याची गोष्ट असून ते गणेश महाराज व अरुण महाराज यांना लाभले ग्रामपंचायत चे सरपंच व त्यांचे सहकारी हा उपक्रम राबवितात ही भूषणावंह गोष्ट...- पांडुरंग महाराज गिरी, वावीकर.
स्वागत व प्रास्ताविक जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. मानपत्राचे वाचन अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त हभप दिपक महाराज देशमुख यांनी केले. आभार अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे यांनी मानले. यावेळी गानकोकिळ किरण महाराज शेटे, मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे, नितीन महाराज गोडसे, कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाकचौरे, गंगा बाबा वाकचौरे, सूर्यकांत ढगे, सिताराम वाकचौरे, संभाजी वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, नामदेव निसाळ, सागर वाकचौरे, गणेश रेवगडे, गोरख वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, अमित वाकचौरे आदी उपस्थित होते.