shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून महविकास आघाडी चा निषेध


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)

कोकणातील राजकोट किल्ल्यावरील संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळामुळे पडला…ही घटना सर्व शिवभक्तासाठी अत्यंत दुःखत आहे,परंतु कायमच छ.शिवाजी महाराजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसी प्रवृत्ती आजही या विषयाचे राजकारण करुन शिवरायांचा अपमान करत आहेत..
या विकृत प्रवृत्तीच्या निषेधार्थ व शिवरायाच्या सन्मनार्थ आज उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून महविकास आघाडी चा निषेध भाजपा जिल्हा अध्यक्ष मा.विठलरावजी लघें ,संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख मा.अमोलजी खताळ, युवामोर्चा उपाध्यक्ष श्री किरणजी बोराडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मा.योगेशजी गोंदकर मंडल अध्यक्ष मा. वैभवजी लांडगे,जिल्हा सरचिटणीस रोहितजी चौधरी, तालुका अध्यक्ष मा.हरिष वलवे,शहरध्यक्ष मा.शशांक नामन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते..!
close