शिर्डी (संजय महाजन) : श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठान नामपूर यांच्यातर्फे यंदाचा गुणवंताचा गुणगौरव सोहळ्यात ताहाराबादचे रहिवासी नाशिकस्थित गावगाडाकार कविवर्य साहेबराव नंदन तात्या यांना बहूमानांकित राज्यस्तरिय बागलाण गौरव पुरस्कार नासिक उन्नती एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव सोनजे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. प्रविण अमृतकार सरचिटणीस उन्नती एज्यूकेशन सोसायटी नाशिक, सिद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन डॉ. प्रसाद सोनवणे, शिक्षण महर्षी ॲड बापूसो. संभाजी पगारे, कीर्तन रत्न ह. भ. प. रामचंद्र महाराज नंदन।प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शरद नेरकर यांच्या उपस्थितीत अप्पर पोलिस अधीक्षक श्री नितीन गणापूरे यांच्या शुभहस्ते सिद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल ताहाराबाद येथे मानाचा फेटा शॉल श्रीफळ गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी बहुसंख्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पुरस्कार्थी साहेबराव नंदन तात्या यांनी मनोगतातून आभार व्यक्त करत स्वरचित एक अहिराणी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शानदार सोहळ्यास धुळे येथून कविवर्य अॅड. संभाजी पगारे, सेवानिवृत्त प्रा.सौ. पुष्पलता पगारे, पत्रकार राजेद्र गवळी, पुंडलिक आण्णा महाजन, किशोर नहीरे माळी, सुरेश आण्णा नंदन , मधुकरबापू नंदन सह असंख्य शैक्षणिक साहित्य रसिक उपस्थित होते.