मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "स्वामी" संस्था पितृपक्षा दरम्यान १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या १६ दिवसांच्या कालावधीत अन्नदान मोहीम राबवत आहे. सदर उपक्रमाचा उद्देश गरीब, गरजू आणि मुंबईत उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसह धान्य उपलब्ध करून देणे हा आहे.
संस्था दानशूर व्यक्तींना त्यांच्या प्रियजनांच्या स्मरणार्थ त्यांच्या संबंधित तारखांना अन्नदान करण्यासाठी आमंत्रित करते. देणगी धान्य, रोख रक्कम, धनादेश किंवा ऑनलाइन व्यवहाराच्या स्वरूपात दिली जाऊ शकते. कलम ८०जी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्रता सुनिश्चित करण्यासाठी योग्य पावती प्रदान केली जाईल.
अधिक माहितीसाठी आणि या उदात्त कार्यात सहभागी होण्यासाठी, कृपया 8928061391 वर संपर्क साधा. कृपया दिलेल्या भ्रमणध्वनीवर ऑनलाइन पेमेंट व्यवहाराचा स्क्रीनशॉट पाठवावा अशी विनंती "स्वामी" संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.