श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास राठोड मित्रमंडळाच्या वतीने सालाबादा प्रमाणे यावर्षीही हरेगाव येथील मतमाऊली यात्रे निमित्त राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना हरेगाव फाटा,नॉर्दन ब्रँच, हरेगांव आदि ठिकाणी भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.श्री. सुहास राठोड यांच्यासह मित्रमंडळाच्या सर्वच सहयोगींनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला तथा भाविकांनी या फराळाचा लाभ घेतला.
या प्रसंगी मित्र मंडळाचे सर्वश्री सुहास राठोड, सलिम शेख, पांडुरंग सातपुते,
सोनु राठोड तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११