shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी आकाश आढागळे यांची नियुक्ती


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपुर येथील आकाश आढागळे यांची नुकतीच श्रीरामपुर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. श्री आढागळे यांनी सर्वसामान्य नागरीक तसेच लोकहिताचे अनेक कामे मार्गी लावले तसेच समाज बांधवाच्या व विद्यार्थ्याच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे, कार्याध्यक्ष संदिप वरपे, सरचिटणीस सौरभ देशमुख, सुरज मोरे,मातंग अस्मिता संघर्ष सेना भागचंद नवगिरे, भिमशक्तीचे विलास जाधव, शकिलभाई सय्यद, ऋषी उमाप, रवी उमाप, विकास उमाप आदिनी आढागळे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. आभार अध्यक्ष भागचंद नवगिरे यांनी मानले.

पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close