दिव्यांग बांधव गणेश धनवडे यांचा वाढदिवस निमसाखर येथे उत्साहात साजरा.
सागर मिसाळ व प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी घरी जाऊन शुभेच्छा देऊन केला साजरा.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे दिव्याग बांधव गणेश धनवडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी घरी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व तसेच एन एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य चंद्रकांत रणवरे ,मलगुडे सर व पत्रकार बाळासाहेब रणवरे व ग्रामस्थांकडून राहुल जाधव व पत्नी सौ शामल राहुल जाधव यांनी घरी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा गणेश धनवडे यांना दिल्या.
तसेच आनेक ग्रामस्थांनी फोन वरून व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या बद्दल गणेश धनगर यांनी धन्यवाद मानले. गणेश धनवडे हे दोन्ही पायाने दिव्यांग असूनही त्यांचा जनसंपर्क हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे तसेच त्यांच्या प्रत्येक निमसाखरच्या घडामोडीवर लक्ष असते. सामाजिक क्षेत्रातील जाण असलेले ते व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.