प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज मतदारसंघाच्या विकासाची कामे आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने मार्गी लावणाऱ्या आमदार नमिता मुंदडा यांनी गणेश उत्सवामध्ये केज मतदार संघ पिंजून काढला आहे. सोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांनी गणेशोत्सवात संपूर्ण केज- अंबाजोगाई विधानसभा मतदार संघ पिंजून काढत गावा-गावात जावून गणनायकाची पूजा अर्चा व आरती करून गणेश भक्तामध्ये उत्साह निर्माण केला आहे.
तसेच आ.नमिता मुंदडा यांनी महिलांसाठी गौरी-गणपतींची सजावट आणि आरास स्पर्धा आयोजित करून भरगच्च असा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाद्वारे महिलांना एकत्र करून त्यांचे कलागुण व बुद्धी कौशल्य वापरून लेक वाचवा लेक जगवा, पर्यावरण संरक्षण, आरोग्य व स्वच्छता, यासह पारंपरिक सजावटी सोबतच संगणक युग असे विविध विषयांच्या पार्श्र्वभूमीवर सादर केलेले आकर्षक देखावे यांना बक्षीस देवून महिलांमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण केले आहे.
आ.नमिता मुंदडा यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.वासुदेव नेहरकर, भगवान केदार, महादेव सुर्यवंशी,शरद इंगळे,पापा शिंदे, सुरेश नांदे, सुनील घोळवे, प्रकाश मुंडे, राहुल गदळे, अतुल इंगळे, शिवाजी पाटील, धनराज पवार,संतोष जाधव राजेभाऊ मुंडे सह असंख्य कार्यकर्ते सोबत आहेत.
या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने व जनसंपर्कामुळे आता केज-अंबेजोगाई मतदारसंघातून ओन्ली नमिता नावाचा जयघोष ऐकावयास मिळत आहे.