शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
श्री साईबाबा संस्थानचे कर्मचारी श्री एकनाथ गेंदा सोनवणे हे आपल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने काल श्री साईबाबा संस्थान च्या सभागृहात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षजी गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकारामजी हुलवळे प्रशासकीय अधिकारी सौ प्रज्ञाताई मांडोळे आदींनी त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षजी गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवळे यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, एकनाथ सोनवणे सन १९८९ साली श्री साईबाबा संस्थानच्या स्वच्छता विभागात रुजू झाले त्यानंतर त्यांनी संरक्षण विभागात काम केले सध्या ते श्री साई प्रसादालय विभागात कार्यरत होते.श्री साईबाबांची व साईभक्तांची सेवा इमाने इतबारे चाकरी केली, यातुन एक आत्मिक समाधान मिळाले असे सोनवणे यांनी आपली भावना व्यक्त केली.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मेकॅनिकल विभागाचे अधिकारी अतुलजी वाघ, आस्थापना विभागातील अधिकारी, विभागप्रमुख आदिंसह सोनवणे परिवारातील सौ उषाताई सोनवणे, राकेश सोनवणे, अनिता बागुल,विक्की बागुल, रविंद्र सोनवणे, संगिता सोनवणे आदी सदस्य उपस्थित होते.