shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक प्रजनन आरोग्य व अधिकार या विषयावर अंगणवाडी सेविका यांची एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*.

*निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था  व एकात्मिक बाल विकास सेवा योजना  प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने  लैंगिक प्रजनन आरोग्य व  अधिकार या  विषयावर अंगणवाडी सेविका यांची एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*.
 
इंदापूर: दि 5 पंचायत समिती इंदापूर येथील लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका लैंगिक प्रजनन आरोग्य या विषयावर एकदिवस कार्यशाळा संपन्न झाली‌
      उपक्रमाची सविस्तर माहिती
  व प्रास्तविक रवी सर यांनी केले त्यानंतर सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे *बालविकास प्रकल्प अधिकारी  संदीप  काळे सर व  अमोल मेरगळ सर ,  महीला बाल संरक्षण अधिकारी बंडगर सर  समाजबंध संस्थेचे संवादक  स्वाती महानंदा सुरेश मॅडम यांच्या स्वागताने  व शिक्षक दिनानिमित्त सावित्री फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली*.

सदरची कार्यशाळा एकूण दोन  सत्रांमध्ये घेण्यात आली
वयात येताना होणारे शारीरीक भावनिक बदल,
सौंदर्य सकंल्पना,
मासिक पाळीचे चक्र, मासिक पाळीवळी होणारे शारीरिक त्रास व त्यावरील उपाय,  भावनिक पातळीवरील आव्हाने व त्यावरील उपाय, चौरस आहार, शोषक साहित्याचे पाच प्रकार, कापडी पॅड, सॅनिटरी पॅड, Mentrual कप, टॅम्पून वापरायचे फायदे तोटे व वापरताना घ्यावयाची काळजी, योग्य विल्हेवाट, मासिक पाळी बाबत काळजी करण्याच्या व काळजी न करण्याच्या गोष्टी, पाळीतील आजार लक्षणे उपाय, गर्भधारणा पाळीविषयी अंधश्रद्धा, गैरसमज आणि विज्ञान, रजोनिवृत्ती व अंगणवाडी सेविकांची जबाबदारी व भूमिका याविषयीचे मार्गदर्शन संवादक यांनी केले.  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मधुमीता  मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन  किरण  यादव यांनी केले.

◆ निर्माण संस्था उपस्थित प्रतिनिधी - *रवी  पवार सर , अतूल ढोणे सर, संकेश सर,निर्मळ  नाईक मॅडम, निशा ताई, कुमार भाऊ , नितीन भाऊ व  संस्थेचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.*
close