श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगांव येथील मतमाउली यात्रेनिमित्त सुरु असलेल्या कार्यक्रमात पवित्र मातेप्रमाणे लीन,दीन, नम्रपणा आचरण करावा असे दैनंदिन नोव्हेना भक्ती प्रसंगी फा.आनंद गायकवाड यांनी आपल्या प्रबोधनात्मक प्रवचनात सांगितले.ते पुढे म्हणाले की,आपण सर्व दि. ६ सप्टे. रोजी दिनाच्या कैवारिणी पवित्र मारिया या विषयावर मनन चिंतन करीत आहोत.आजचा विषय हा अत्यंत मार्मिक आहे.कारण खरोखरच पवित्र मत आम्हा प्रत्येक दीन जणांची कैवारिणी व मध्यास्थिनी आहे.आणि म्हणूच आज तिच्या जीवनावर विचार करीत असताना आमचे जीवन तिच्यासारखे व्हावे याकडे आपण लक्ष देणार आहोत.
तर ज्यावेळी गाब्रीयल देवदूत हा तिच्याकडे आला व सांगितले हे कृपापूर्ण स्त्रीये तू पवित्र आत्म्याने तू गर्भवती राहणार आहे,ती सर्वप्रथम घाबरली, परंतु नंतर गाब्रीयल देवदुताने तिला योग्य रीतीने सर्व माहिती सांगितल्यावर की पवित्र आत्म्याच्या कृपेने हे सर्व होणार आहे.तिने सांगितले मी प्रभूची दासी आहे.तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी होवो,पवित्र मातेने स्वत:ला इतके नम्र बनविले की ती प्रभूची दासी एक लीन,दीन स्त्री अशी परमेश्वराजवळ झाली.आज आपण जर विचार करतो कुमारी माता ही दीनांची कैवारिणी आहे ती आम्हाला तिच्या प्रमाणे लीन दीन होण्यासाठी आम्हाला आमंत्रि करीत आहे.कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की पवित्र माता आम्हाला शिकवते.आपण प्रत्येक जण येथे उपस्थित व्यक्ती तिच्यावर विश्वासाने ती आपली माता आहे.ती मध्यस्थी ख्रिस्ताकडे करते,आमच्या मागण्या ती ख्रिस्तापर्यंत पोहोचवते, आणि अनेक रूपाने आपल्या जीवनात चमत्कार घडून येतात.ज्यावेळी आपण स्वत:चे समर्पण करीत असतो,ज्यावेळी आपले अंत:करण उघडे करीत असतो आणि परमेश्वराजवळ नतमस्तक होतो.तेंव्हाच आपल्या जीवनात चमत्कार घडत असतात. कारण पवित्र मातेने देखील सांगितले की मी प्रभूची दासी आहे.तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी होवो,तिने प्रभूचा शब्द परमेश्वरचा शब्द प्रमाण मानला आणि तिचे सर्वस्व परमेश्वराच्या शब्दाला अर्पण केले.आज तीच पवित्र माता आम्हा प्रत्येकाला देखील आमची स्वत:ची इच्छा नव्हे तर देवाची इच्छा प्रमाण मानण्यासाठी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बोलावीत आहे. आपण प्रत्येक वेळी प्रार्थना म्हणजे माझी इच्छा परमेश्वराजवळ मांडण्याचा प्रयत्न करतो.की माझी इच्छा परमेश्वराने पूर्ण करावी.नाहीतर आम्ही हताश होतो निराश होतो.व देवावरचा विश्वास देखील उडून जातो.परंतु पवित्र मत तिच्या जीवनाव्दारे शिकवत आहे की प्रार्थना म्हणजे परमेश्वरावरील विश्वास हा आपला सदैव टिकून असायला हवा.कारण प्रार्थना परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारी आहे.म्हणून माझीच इच्छा नाही माझी इच्छा असेल परंतु परमेश्वराची इच्छा काय आहे ती पवित्र माता आपल्याला दाखवते आपण मनन चिंतन करीत असताना ती दीनांची कैवारी आहे.आपण कोणकोणत्या गोष्टीने दीन आहोत गरीब आहोत,कारण तिचा पुत्र असताना देखील त्याने सांगितले की पवित्र आत्मा माझ्यावर आलेला आहे, दीनांच्या सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला पवित्र केले आहे.हा पर्त्येक व्यक्ती पवित्र मातेकडून शिकत आहे की प्रभू ख्रिस्त देखील देवाचा पुत्र असतना देखील त्याने बऱ्याच गोष्टी त्याने मातेकडून शिकल्या. आपण त्या मातेचे सर्व भक्तगण आज येथे उपस्थित आहोत.ती आम्हाला काय काय शिकवते,ती आम्हाला लीन होण्यासाठी दीन होण्यासाठी शिकवत आहे. कारण आपण जर गर्वाने स्वत:ची पुढारकी करीत असो,तर त्याचा उपयोग नाही.कारण उंच उंच राहून आभाळही थकते,कुठेतरी टेकते,आपण कुठेतरी नम्र व्हायलाच हवे,पवित्र माता आपल्याला नम्र होण्यासाठी शिकवते आणि त्याच प्रकारे नम्र होवून अनेक प्रकारचे चमत्कार आपल्या जीवनात येतील कारण आपण ज्यावेळेस स्वत:ला नम्र करतो.परमेश्वर देखील त्याचा आशीर्वाद आम्हावर देतो म्हणूनच त्या पवित्र मातेव्दारे देखील शिकू या तीच्यसारखे लीन दीन होवून परमेश्वराचा आशीवाद आपल्या प्रत्येकावर घेवू या.असे प्रतिपादन फा आनंद गायकवाड पुणे यांनी केले.
या नोव्हेनाप्रसंगी प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ,फा फ्रान्सिस ओहोळ,आदी सहभागी झाले होते.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे,शिरसगांव
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११