श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगांव येथील मतमाउली यात्रेनिमित्त दि. ९ सप्टे.रोजी “पवित्र मरीयेचा निष्कलंक गर्भसंभव “या विषयावर रे फा.अजय डीमोंटे यांनी हरिगाव मतमाउली यात्रापूर्व पाचव्या नोव्हेनाप्रसंगी प्रतिपादन केले की, मनुष्य हा विरोधाभासक आहे.ह आपल्या जीवनात प्रत्येक जन जीवनात अनुभवतो. व्दितीय जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.हे ओळखत नाही.
मनुष्य हा जगातील श्रेष्ठ प्राणी आहे.मनुष्य श्रेष्ठ असताना श्रेष्ठ कार्य घडतात. तो धैर्यवान आहे दानशूर आहे परंतु मनुष्याची जर दुसरी बाजू पाहिली तर आपल्याला दिसून येते की मनुष्य खालच्या दर्जाला जाऊ शकतो.तो स्वार्थी आहे,तो दुष्ट आहे तो सूड घेतो.तो पापी आहे.जेंव्हा या दोन गोष्टी पाहतो चांगल्या गोष्टी व दुष्ट गोष्टी,यावरून मनुष्यात विरोधाभास आहे. हे का घडते.आपण आपल्या जीवनाकडे पाहतो. मनुष्याला असे बनवले आहे का? याचे उत्तर आपण जेंव्हा बायबलकडे वळतो त्याला दिसते.देवाने संपूर्ण सृष्टी बनवली.मनुष्याला बनविले देवाला फार आनंद झाला.परंतु मनुष्याने परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. त्यापेक्षा मनुष्याने भयंकर पाप केले ते म्हणजे मनुष्याने देवावर विश्वास ठेवला नाही.जेंव्हा आपण कोणावर विश्वास ठेवत नसतो तेंव्हा त्या व्यक्तीचा धिक्कार करतो. तेच माणसाने केले.मानवाला आत्मपरीक्षण करण्याची गरज होती.माणसाला सर्व शक्ती आल्यामुळे देवाची गरज नव्हती त्यामुळे मनुष्याने सांगितले की मला देवाची गरज आहे.ज्या देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनविले.परंतु ती प्रतिमा दुरून पाहिली. पण त्याचा शेवट वेगळाच झाला.देवाने पवित्र म्रीयेला जन्म दिला की अशी आई स्त्री जी इतिहास घडवणार होती देवाच्या पुत्राला जन्म देण्या अगोदर तिला पवित्र ठेवले. जेंव्हा आपण तिच्या जीवनाकडे पाहतो तिने देव माझा सर्वस्व आहे हे गीत गायले.पवित्र मरीयेच्या दोन स्थितीमधून जात असतो. एक म्हणजे जर आपल्याला पवित्र राहायचे असेल तर आपण खड्ड्यात पडतो परंतु परमेश्वर पुन्हा आपल्याला निष्कलंक करतो. खड्ड्यात पडण्य अगोदर एक शक्ती आपल्याला थांबवते.तेच आपण पाहतो तिला खड्ड्यात पडण्यापासून तिले देवाने वाचविले. त्यामुळेच तिला निष्कलंक गर्भसंभव म्हटले जाते. आपण तिच्या आश्रयाखाली येत असताना पवित्र मरीयेसारखे जीवन आपण जगावे अशी त्यांनी प्रार्थना केली.आजच्या नोव्हेनात प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ सहभागी होते.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगांव
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११