shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लोकांच्या कामाला देव मानून काम करणारा राजा माणूस पत्रकार तुषार महाजन


प्रभावशाली व्यक्तिमत्व युवा पत्रकार तुषारजी महाजन..!

यांचा आज जन्मदिवस प्रथमतः मनस्वी शुभेच्छा....

       यानिमित्त - आदर्श युवक कसा असावा असं जेव्हा स्वामी विवेकानंद आदर्श युवकाची व्याख्या करतात तेव्हा आठवतो चेहरा तो तुषार संजय महाजन यांचा, आदर्श पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, तुषार महाजन यांना आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त ग्रीन वर्ल्ड पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आदर्श पत्रकार म्हणून ओळख असलेला सामाजिक आणि पर्यावरण विषयक प्रत्येक कार्यात हिरिरीने आपला सहभाग नोंदवितात. आपल्या अनोख्या उपक्रमाच्या शैलीने कायम चर्चेत राहणाऱ्या व विशेष प्रयत्नाने विविध उपक्रम मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्या आहे.


 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या, कोविड काळात प्रसादालय चालू करणे यासाठी निवेदन, अनाथालय येथे खाऊ वाटप व शालेय वस्तू वाटप, विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांसाठी आंदोलने व निवेदन, अनेक वेळा साईनाथ रक्तपेढी येथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित त्यांनी केले. यासोबतच त्यांचे एक स्वप्न होते की, शिर्डीत गोरगरिबांसाठी कॉलेज झाले पाहिजे त्यासाठी संघर्ष करत शेवटी कॉलेज सुरू झाले. निस्वार्थ भावनेने काम करणारे आपल्यासारखे व्यक्तिमत्व या जगात खूप कमी आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चार वर्षापासून जंगली झाडांचे भव्य वृक्षारोपण करण्यात येत आहे. 
       आदरणीय तुषारजी महाजन, आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात आपण कार्यरत आहे. सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने तुषार महाजन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये सहमंत्री आणि शहराध्यक्ष युवा वॉरियस म्हणून जबाबदारी पार पाडली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघमध्ये काम केले. यासोबतच समाजातील घडणाऱ्या घटना प्रतिबिंबित करणारे माध्यम म्हणजे पत्रकारिता क्षेत्र यात देखील ते वेळेचा सदुपयोग करत कार्यरत आहेत. त्यांनी १५ न्युजपेपर व ५ न्यूज चॅनल साठी काम केले. सध्या जिल्हाध्यक्ष ग्रीन फाउंडेशन, युवकांनी युवकांसाठी सुरु केलेल्या सोशल तरुणाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे ते प्रसिद्धीप्रमुख आहेत आणि जिल्हाध्यक्ष जीवन आधार फाउंडेशन (रिस्क्यू फोर्स), तालुका संयोजक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया, भारतीय जनता युवा मोर्चा प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, 
       आपण समाजामध्ये राहतो, खऱ्या अर्थानं समाजाचे आपल्यावर अतोनात उपकार आहेत. त्याची पूर्णतः आपण परफेड करु शकत नाही. मात्र जितकं होईल तितकं समाजासाठी प्रामाणिकपणे जगत राहायचं, काम करत राहायचं असे प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिस्त, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, हे सर्व गुण त्यांच्यात आहेत तुषार दादा हे खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. 
       बारावी झाल्यानंतर शिर्डीतून बीकॉम डिग्री पूर्ण केली त्यानंतर कोपरगाव येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी एम कॉम केले. आता वेल्थ मॅनेजर म्हणून काम बघतात सर्व प्रकारचे फायनान्स, हेल्थ व लाइफ इन्शुरन्स काम बघतात, तुषार दादांना शेअर मार्केटचा तीन वर्षाचा अनुभव देखील आहे. आम्हाला कायम फायनान्स, ट्रेडिंग संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करत असतात. दरवर्षी महागाई मध्ये वाढ होणे अटळ, भविष्यातील पैशांची चिंता लाईफ इन्शुरन्स काढून दूर करा व अनपेक्षित आरोग्य खर्चापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण नक्की करा, आपल्या जीवनात पॉलिसी किती महत्त्वाची आहे त्याचे आम्हाला मार्गदर्शन करत असताना अनेक समाज बांधवांना आजारपणात आधार म्हणून आर्थिक सहकार्य उभे केले आहे. एसबीआय लाइफ व आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स काम करून नावलौकिक मिळवले. अधिक माहितीसाठी तुम्ही सुद्धा तुषार सरांशी संपर्क करू शकता. 
       खरंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवली काम करत असताना तुषारजी महाजन यांच्याशी जवळून परिचय आला. सातत्याने विद्यार्थ्यांप्रति असलेली तळमळ, प्रशासना विषयीचा पारदर्शभाव, विवेकशीलता, सुविचार व स्पष्ट वक्तेपणा हे सर्व भाव खूप जवळून तुषार दादा मध्ये बघितले, सोबत काम करत-करत आम्ही लहानाचे मोठे झालो.
       छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आपली माणसं मोठी करा आपण आपोआपच मोठे होतो त्यांचे विचार आचारनात आणण्याचे काम करताना दिसत आहे. आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आपल्या पत्रकारिता क्षेत्रालाच देव मानून समाजासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करणारा माझा जिवलग मित्र अर्थात तुषारजी महाजन, राज्याच्या सामाजिक पटलावर जनतेची सेवा हीच ईश्वरसेवा हा भाव ठेवून काम करणारे युवा नेतृत्व फुलत आहे. खरंतर लहानपणापासून चांगल्या-चांगल्या गोष्टी, विचार वाचत असतानाचे एक वाक्य आठवते 'चिखलाच्या गोळ्याला जसा कुंभार हा चिखल ओला असतानाच आकार देतो आणि दुसऱ्यांना थंड पाणी पाजणारा माठ घडवतो' अगदी तसेच किशोरवयीन जीवनात व विद्यार्थी जीवनामध्ये झालेले संस्कार मुलांचे भविष्य घडवत असतात. अगदी याच तत्वावर आई-वडिलांनंतर आम्हाला आईची माया लाऊन तत्वनिष्ठ, मातृभक्त म्हणून घडवण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये झाले. 
       सर्वांसोबत प्रेमाने बोलणारे व मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे कधीही कोणत्याही स्वरूपात मदत लागल्यावर तुषार दादा मदतीला धावून येतात. देवाचे मी आभार मानू इच्छितो कारण देवाने मला हिरा सारखा मित्र दिला. साधेपणा व सच्चाई जोपासणारे दादा नेहमीच गोरगरीब जनतेच्या दुःखात सहभागी असतात. प्रचंड लोकसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे नेतृत्व म्हणून साईभक्त तुषारजी महाजन यांच्याकडे पाहिले जाते. आज समाजामध्ये समाजाचे काम करत असताना गोरगरीब, दुर्बल, निराधार, वंचित, पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून अतिशय ऊर्जादायी प्रेरणेने लढण्याची काम तुषारजी करत आहे. कुठल्याही पदासाठी नाही तर समाजाची जबाबदारी हेच पद समजून रात्रंदिवस एक करत समाजाच्या छोट्या छोट्या गरजांवर व प्रश्नांवर काम करून लोकांचे प्रेम व आशीर्वाद मिळवत आहे.
       तुषार दादा मला नेहमी म्हणत असतात, समाजासाठी जगत रहा, नाव कमवा, आशीर्वाद मिळवा, पैसा तर सर्वच कमावतात. त्यांच्या स्वभावामध्ये एक गोष्ट म्हणजे पैशापेक्षा माणसांना जास्त किंमत देतात त्यांनी आपले जीवन जनतेसाठी व देशासाठी व्यतीत केले आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि समाजाने आपल्या साठी काय केले यापेक्षा आपण समाज व देशासाठी काय करू शकतो हे महत्वाचे असून सर्वांनी संकटात खचून न जाता भेदभाव न करता एकमेकांस सुख दुःखात मदत करण्याची भावना असायला हवी असे नेहमी आम्हा सर्वांना ते मार्गदर्शन करीत असतात, साईबाबांच्या आशिर्वाद नेहमीच मला प्रेरणा देतात व सेवेत आनंद मिळतो, अनेकांनी मला जीवनात आज येथेपर्यंत येण्यासाठी मदत केली त्यांचा मी शतशः आभारी आहे अशी भावना ते आवर्जून व्यक्त करतात, अशा या सामाजिक बांधिलकी असलेल्या या ध्येयवेड्या आणि कार्यमग्न तुषारजी महाजन या व्यक्तीमत्वास असेच समाजहीताचे, लोककल्याणकारी, प्रबोधन पर कार्य करण्यास बळ मिळो ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना आणि सर्व सहकारी यांच्या वतीने सदिच्छा..! 

-व्याख्याते आणि लेखक
प्रफुल्लजी खपके
close