shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एरंडोलचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या कडे केली ही मागणी.

एरंडोल प्रतिनिधी  :- नार पार योजनेतून ०.९ TMC पाणी अंजनी मध्यम प्रकल्प टप्पा दोन साठी मंजूर केले तर प्रकल्पावर प्रत्यक्षात खर्च झालेले बतीस कोटी रुपये वाचतील त्यामुळे धरणगांव एरंडोल तालुक्यातील दुर्भिक्ष ग्रस्त शेत जमिनीला सिंचन लाभ होईल तरी ९०० द ल घ फुट पाणी या प्रकल्पासाठी मंजूर करावे अशी मागणी माजी आमदार महेंद्रसिंघ पाटील यांनी शासना कडे केली आहे.

एरंडोलचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचेकडे ही मागणी.


     या संदर्भात महेंद्रसिंग पाटील यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.अंजनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन यास १९९९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली असून २००३ पर्यंत त्यावर बतीस कोटी रुपये खर्च झाला आहे हा प्रकल्प पावसाळ्यामध्ये गिरणा नदीतून वाहुन जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून गिरणेच्या जामदा डाव्या कालव्या द्वारे “ अंजनीच्या “ साठवण शेत्रात पाणी सोडून साठा निर्माण करणे असा हा मुळ प्रकल्प होता त्याद्वारे एरंडोल धरणगांव तालुक्यातील सुमारे ८००० एकर शेत्रात अतिरिक्त सिंचनाचा लाभ मिळणार आहे.परंतु जल आयोगाने पाण्याची उपलभत्ता नसल्या मुळे प्रकल्पास मंजुरी नाकारली या कारणामुळे तापी महामंडळाच्या नियामक मंडळाने हा प्रकल्प कायम स्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्प कायम स्वरूपी रद्द झाला तर प्रकल्पावर खर्च झालेले ३२ कोटी रुपये पाण्यात जातील सुदैवाने आता नार पार चे सुमारे १०.६ टी एम सी पाणी गिरणा खोऱ्यासाठी मंजूर झाले आहे.

         या पाण्यातून ९०० द ल घ फुट पाणी अंजनी टप्पा क्रमांक दोन करिता मंजूर करावे अशी मागणी निवेद्वनाद्वारे करण्यात आली आहे


 (संदर्भ :- फोटो गुगल वरून.)

close