shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डॉ. संदिप तांबे यांची नि. सा. प. प्र. नि.मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मुळा एज्युकेशनचे कृषी महाविद्यालय सोनई ता.नेवासा येथील विद्यार्थी कल्याण तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदिप कडूभाऊ तांबे यांची नुकतीच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सन २०२३ ते २०२६ या कालावधीकरीता निवड झाली आहे. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्याकडून नुकतेच त्यांना निवडपत्र प्राप्त झाले आहे. शैक्षणिक कार्यातून पर्यावरण पूरक कार्य,नदी स्वच्छता, साहित्य सेवा, सामाजिक कार्य, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, वृक्षारोपण व जनजागृती या कार्याची दखल घेत ही निवड झाली आहे. ते कृषि महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, वृक्षारोपण, नदी स्वच्छता, पथनाट्यातून जनजागृती, विविध पर्यावरण व प्रदूषणपूरक उपक्रम राबवत आहेत. यापूर्वी त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 

त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री आ.शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, संस्थेचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख, सुनिताताई गडाख, प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपपराचार्य प्रा.सुनिल बोरूडे, भेंड्याचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, लतिकाताई पवार, अध्यक्ष तुकाराम अडसूळ, कार्याध्यक्षा छायाताई रजपूत, राज्य संघटक डॉ. शरद दुधाट, पत्रकार कोंडीराम नेहे, राज्य सचिव अनिल लोखंडे, रिल स्टार अशोक शिरसाट, पत्रकार सुनिल दरंदले, सुभाष राख, महावीर चोपडा यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे.


*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close