श्रीरामपूर / प्रतिनिधी:
ख्रिश्चन समाजातील संत मदर तेरेसा यांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी आमदार लहू कानडे यांनी शहरातील प्रशासकीय इमारती जवळील संत मदर तेरेसा यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले की, संत मदर तेरेसा या निस्पृह समाजसेवेच्या प्रतीक होत्या. ज्या येशू ख्रिस्ताने जगभरातील लोकांसाठी प्रेमाचा संदेश दिला. त्याच प्रेम भावनेने संत मदर तेरेसा यांनी समाजातील गोरगरीब माणसांची पीडितांची आरोग्य सेवा केली. आयुष्यभर त्यांनी हे सेवा कार्य केले. त्यानिमित्ताने आपले संपूर्ण आयुष्य एक मिशन केले. या माध्यमातून मिशनरीज तयार केले. आजही त्यांचे कार्य जगभर चालू आहे. व्हॅकेटन सिटीने त्यांना संत हे थोर पद दिले. समाजाने त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, पत्रकार दीपक कदम, संतलूक हॉस्पिटलच्या व्यवस्थापक सिस्टर धांसी, सिस्टर प्रभा, सिस्टर सरोज, सिस्टर रिटा, सिस्टर अँनी, सिस्टर जॅकलीन तसेच पी. एस. निकम, अशोक जाधव, राजू साळवे, रवींद्र लोंढे, निशिकांत पंडित, रज्जाक पठाण, अविनाश काळे, सुरेश ठुबे, लेविन भोसले, राकेश दुशिंग, संतोष गायकवाड, इग्नाती रूपटक्के, रवींद्र गायकवाड, किरण बोरावके, भाऊसाहेब तोरणे यांच्यासह ख्रिस्ती बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११