shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पुणे जिल्हा महिला आघाडी प्रतिनिधी पदी सौ.सुरेखा काळे यांची निवड*

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पुणे जिल्हा महिला आघाडी प्रतिनिधी पदी सौ.सुरेखा काळे यांची निवड*
आप्पासाहेब यमपुरे 
पळसदेव दि:१३ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना दि:12 वार गुरुवार पुणे येथे झालेले संघटनेच्या बैठकीत सौ.सुरेखा काळे यांची एकमताने महिला आघाडी जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देण्यात आले.
         
         संघटनेची घटना व वेळोवेळी करण्यात आलेले नियम यांचे पालन करून सभासद कर्मचारी निश्चिती जोपासणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी आपण कार्यतत्पर असावे असे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने कडून सांगण्यात आले.

         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरकळ क्र.२ या शाळेत त्या सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.शाळेच्या आदर्श शिक्षका सौ.सुरेखा काळे यांची जिल्हा प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून पुढील संघटनात्मक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
       
            महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वेळोवेळी आंदोलनात सहभाग नोंदवत सहकार्य व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख व मरकळ क्रमांक दोन शाळेच्या उपक्रमशील,विद्यार्थी प्रिय,आदर्श शिक्षिका असा त्यांचा नावलौकिक असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ पुणे जिल्हा संघटक प्रा. आप्पासाहेब यमपुरे यांनी दिली.
close