गणेश उत्सव सण हा, झोपडी पासून महालापर्यंत लहान थोरांना आनंद देतो - दशरथ माने .
इंदापूर : गणेश उत्सव सण हा, झोपडी पासून महालापर्यंत लहान थोरांना आनंद देतो. सोनाई परिवार हा देश पातळीवर आपला नावलौकिक गुणवत्तेच्या आधारावर कमवून आहे. श्रद्धा, अध्यात्म, भक्ती, विज्ञान अशी सांगड गणरायाच्या कृपेने असल्याने, सोनाई परिवार लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचा, आधारस्तंभ बनला आहे असे प्रतिपादन सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी इंदापूर शहरातील सोनाई पॅलेस निवासस्थानी भक्तिमय वातावरणात, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य सभापती प्रवीण माने व माने कुटुंबीयांच्या उपस्थितीत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर केले.
यावेळी सोनाई परिवाराचे संचालक अतुल माने, लताताई दशरथ माने, मयुरी प्रविण माने, पुजा अतुल माने, वैशाली विष्णूकुमार माने, यांच्यासह माने कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.