shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा.

एरंडोल :- शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट (औषधनिर्माता) दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. तत्पूर्वी जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयामध्ये 23, 24 व 25 सप्टेंबर असे तीन दिवसीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा.

       जागतिक फार्मासिस्ट दिन हा एक जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे जो 2009 पासून दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो, ज्याची स्थापना 1912 मध्ये जगभरातील आरोग्य सेवा प्रणालींमध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखण्यासाठी करण्यात आली होती.

 कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. शास्त्री यांनी फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधील अत्यंत विश्वासू दुवा असतो व तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो असे प्रतिपादन केले. जागतिक फार्मसी दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळील सत्रामध्ये वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या विषयावरचे मत सुयोग्य पद्धतीने मांडून आपली बाजू सिद्ध कशी करता येईल हा त्यामागचा हेतू होता. 


दुसऱ्या सत्रामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळील सत्रा मध्ये प्रश्नमंजुषा तसेच दुपार सत्रामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन चे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि तिसऱ्या दिवशी दि. 25 सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एरंडोल शहरात रॅलीचे आयोजन केले होते. दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट विषयी पथनाट्य सादर करत परिसरातील लोकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट जनजागृती विषयी घोषणा देत परिसर दुमदूमुन टाकला.रॅली ची सुरुवात एरंडोल बस आगार प्रमुख सौ.नीलिमा ईशी व बस स्थानक प्रमुख श्री.गोविंद बागुल यांच्या हस्ते करण्यातआली,एरंडोल बस स्थानकावर पथनाट्य सादर करून एरंडोल शहरात विविध ठिकाणी जनजागृती करत रॅलीची सांगता बुधवार दरवाजा येथे करण्यात आली. तत्पूर्वी रॅलीची शिस्तबद्धता राखण्यासाठी महाविद्यालयातील सुज्ञ विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. 

त्यानंतर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. एकंदरीत संपूर्ण सप्ताहाचे नियोजन उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे, प्रा. महेश पाटील, प्रा. कारण पावरा, प्रा. सुमेश पाटील, प्रा. मंगेश पाटील, प्रा. चंद्रभान पाटील, प्रा. अनिता पावरा, प्रा. पुर्वा पापरीकर, प्रा. रोशनी पाटील व प्रा. कीर्ती पाटील यांच्या विशेष मेहनतीने सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. असे जन संपर्क अधिकारी श्री शेखर बुंदेले यांनी कळवले.

close