श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगांव येथील मतमाउली चर्च याठिकाणी (दि ७ सप्टे.रोजी) यात्रापूर्व मतमाउली नोव्हेनाप्रसंगी श्रीरामपूर येथील लोयोला सदन प्रमुख धर्मगुरू फा. प्रकाश भालेराव यांनी धन्य माता पवित्र मारिया या विषयावर पर्वचन करताना सांगितले की, पवित्र मारिया ही प्रभू येशू ख्रिस्ताची माता आहे तशीच ती अखिल मानवजातीची देखील माता आहे. ज्याप्रमाणे तिने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जागून प्रभू येशू ख्रिस्ताला घडविले त्याचेवर चांगले संस्कार केले.आणि देवाचा पुत्र म्हणून त्याचे जीवन अखिल मानवजातीसाठी समर्पित करण्यासाठी त्याला प्रेरणा व शक्ती दिली.त्याचे बरोबर राहिली त्याचे दु:खात सोबत राहिली.गौरवात सुद्धा सहभागी राहिली.ती धन्य माता आहे.ती एकमेव माता आहे,प्रभूची माता आहे.
सर्व ख्रिस्ती जनांची माता आहे, म्हणून त्या आदर्श मातेचा आपण सन्मान व गौरव करीत असतो.जेणेकरून ती आपल्याला प्रभू परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा तसा देवपित्याचा आशीर्वाद आपल्यासाठी मागण्यासाठी ती मध्यस्थी करीत आहे.व तिची मध्यस्थी प्रभू येशू ख्रिस्त कधी नाकारीत नाही.आपला विश्वास आहे.श्रद्धेने आपण दरवर्षी तिच्या चरणी एकत्र येत असतो व प्रभू ख्रिस्ताचा व परमेश्वराचा गौरव करीत असतो.या मातेच्या जीवनाकडे आपण पाहतो तेव्हा आपण नम्रतेने जीवन जगावे श्रद्धेने जीवन जगावे असे ती आपल्याला शिकवते. प्रत्येक माता ही आपल्या बाळाला देवाकडे घेऊन येत असते व देवाची ओळख करून देत असते. आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.देवदुताने तिला धान्य म्हटले आहे.म्हणून आपण धन्य म्हणतो कारण ती एकमेव अशी माता आहे. चौथ्या शतकापासून आपण गौरव करतो.ती येशूची माता आहे देवाची माता आहे. परमेश्वराने तिला स्वर्गराणीचा मुकुट देऊन स्वर्गाची व पृथ्वीची राणी गौरविले आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा राजपुत्र आहे.मानवजातीचा तारण करणारा परमेश्वर आहे म्हणून त्याचेकडे श्रद्धेने येत असतो.व आपल्या मनोकामना तिच्या मध्यस्थीने पूर्ण करीत असतो. आजच्या नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू फा डॉमनिक रोझारिओ, फ्रान्सिस ओहोळ,पॉली डिसिल्व्हा,आदी सहभागी झाले होते.
यावेळी दि. ८ रोजी महागुरूस्वामी औरंगाबाद बर्नाड लान्सि पिंटो यांचे याच ठिकाणी नोव्हेना प्रवचन होणार असल्याचे सांगण्यात आले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगांव
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११