shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षकदिनानिमित्त मख़दुम सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्टस् टी शर्ट वाटप


कोणतेही मदत कार्य हे कर्तव्य समजून करण्याची गरज- सुनील भंडारी 

अहमदनगर / प्रतिनिधी:
 समाजामध्ये गरजूंना मदत करणार्यांची संख्या वाढली आहे. पण लोक मदत करणे म्हणजे उपकार समजून करायला लागले आहे. ही मानसिकता बदलून कोणतेही मदत कार्य हे कर्तव्य समजून करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संगीतप्रेमी सुनील भंडारी यांनी केले.
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त पाईपलाईन रोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैदुवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना दानशूरांच्या सहकार्याने मोफत स्पोर्टस् टी शर्ट चे वाटप सुनिल भंडारी  यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, जिल्हा परिषद प्राथ शाळा वैदवाडीचे 
मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे, उपाध्यापिका सौ मिनाक्षी जाधव आदि उपस्थित होते. 
 
          पुढे बोलतांना सुनील भंडारी म्हणाले की, समाजामध्ये स्वार्थीपणा फार वाढत चाललेला आहे. कोणतेही समाजा कार्य करतांना बहुतांश संघटनांचा त्यामागे काही ना काही हेतू असतो, असे समाजकार्य किंवा पुण्यकार्य परमेश्‍वरालाही नकोय. नि:स्वार्थीपणाने आज कार्य करण्याची खरी गरज असून, त्यासाठी बौद्धीक प्रबोधन होण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार खंडागळे यांनी केले. प्रास्तविक  मिनाक्षी जाधव यांनी केले तर आभार सय्यद शफक यांनी मानले. 

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close