shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गणेशोत्सवानिमित्त साईसेवा मतिमंद विद्यालयात स्तवन मंजिरी पठण*


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी 

   आज दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे साई स्तवन मंजिरी पठण करण्यात आली.     

      दासगणू महाराजांनी साई स्तवन मंजिरीचे स्तोत्र १९१८ साली ९ सप्टेंबर रोजी माहेश्वरी येथे लिहिले. आज या स्तोत्राला १०६ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने व गणेशोत्सवाचे औचित्य साधून आज साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे डॉ.श्री धनंजयजी जगताप यांजकडून विद्यालयात साई स्तवन मंजिरी पठणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शिर्डी व शिर्डी परिसरातील ग्रामस्थ हजर होते. त्यामध्ये श्री भास्करजी जगताप, श्री प्रमोदजी शेळके, श्री तिडके सर, श्री बबनरावजी शिंदे, श्री प्रतापरावजी तुरकणे, श्री राहुलजी गोंदकर, श्री नारायणजी दारडे, श्री पितांबर भराटे, श्री गवारे साहेब हे मान्यवर उपस्थित होते. साई स्तवन मंजिरी पठण झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते  व श्रीकृष्ण, श्री गणेश व साईबाबांची आरती घेण्यात आली. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. नंतर पर्यावरण शपथ घेण्यात आली व डॉक्टर व सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयास पपईचे झाड भेट देण्यात आले व सर्व पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. 
    सर्व कार्यक्रम झाल्यानंतर पाहुण्यांचे साईबाबा शाल देऊन व चहा नाश्ता देऊन आभार मानण्यात आले.
  हा सर्व कार्यक्रम विद्यालयातील मुख्याध्यापिका, शिक्षक व सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.
close