shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सोलापूर जिल्हा काँग्रेस (इंटक) ची कार्यकारणी जाहीर


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३०/ करमाळा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंटक अर्थात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज दिनांक 29 सप्टेंबर रविवार रोजी दुपारी 12:30 वाजता शासकीय विश्रामगृह करमाळा येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाजी सेनसाखळे, सचिव नवनाथ दत्तात्रय काळे, सहसचिव अविनाश किसन मोरे, कोषाध्यक्ष सिद्दाराम भीमराव कोळी, संघटक शंकर शिवयोगी लोभे, महिला कामगार अध्यक्ष सुजाता राजकुमार वाघमारे, महिला कामगार उपाध्यक्ष मंगल लहूदास वाघमारे, मीडिया प्रमुख राजू तैमूर सय्यद, सोशलमीडिया प्रमुख अजीम शेख फरीद शेख, युवा जिल्हाध्यक्ष नागसेन ज्ञानदेव डूरके, सदस्य अविनाश दिलीप वाघमारे, चंद्रकांत नारायण कांबळे, संजय येताळ अवचर, भिमराव माणिकराव नाळे, करमाळा बांधकाम कामगार शहराध्यक्ष चेतन जयराज आव्हाड तसेच करमाळा बांधकाम कामगार शहर उपाध्यक्ष पदी संजय रामचंद्र कुकडे यांची निवड जिल्हाध्यक्ष अमोल जाधव व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारणीची बैठक व पदाधिकाऱ्यांचे निवडीच्या या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सहित महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र जगताप, महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिताताई गोरे तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे हे उपस्थित होते. यावेळी शंकर लोभे यांनी सूत्रसंचालन केले तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी काँग्रेस इंटकचे महत्त्व व धोरणे समजावून सांगितले व दहा वर्षे झाली सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस इंटक कोणालाही माहीत नव्हते तर जे  होते त्यांनी फक्त नावा पुरते पदे घेऊन ठेवली पण अमोल जाधव यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा एका महिन्यात पिंजून काढला व पदाधिकाऱ्यांची निवडी करून त्यांना काँग्रेस इंटकचे धोरणे व लक्षणे समजावून सांगितले.

महिलांनी लोकांच्या हाताखाली कामनकरता स्वतः उद्यमी व्हावे व आम्ही महिलांचे न्याय हक्कासाठी तत्पर राहू तसेच काँग्रेस इंटकच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त महिलांना स्वतः व्यावसायिक होता येईल यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असे आश्वासन महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिताताई गोरे व पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे यांनी केले.

यावेळी आप्पा कांबळे, विक्रम साळवे, बंटी पवार, कुणाल चवरे, दत्तात्रय आलाट, अजिनाथ आलाट, भाऊसाहेब भोसले, हर्षद गुळवे, राजाभाऊ मोहोळकर, आदित्य जाधव, रोहन परदेशी, अनिकेत कांबळे, मनोज ताकतोडे, तन्मय भिताडे, गणेश झिंजाडे, राज शेख, संतोष गोरे, पिंटू मोरे, नागेश चव्हाण, विजय गायकवाड, सार्थक उबाळे, नागेश पवार, इत्यादी काँग्रेस इंटक चे कार्यकर्ते उपस्थित होते.
close