राजमोहंमद शेख / कोल्हार:
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेची विद्यार्थिनी कु. साक्षी रवींद्र नालकर हिची वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेत द्वारे नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये निवड झाली आहे साक्षीने नीट परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातून ७२० गुणांपैकी ६१० गुण मिळवून गुणवत्तेच्या आधारावर नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळविला. साक्षीचे बालवाडी पासूनचे संपूर्ण शिक्षण कोल्हार येथील प्रवरा हायस्कूल मध्ये झाले आहे.
विद्यालय जीवनात वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळेल तसेच इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत देखील तिने प्रथम क्रमांक मिळविला होता. रामपूर सारखे ग्रामीण भागातून इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये येऊन तिने गुणतेच्या आधारावर आपल्या मातापित्यांचे स्वप्न पूर्ण केले. तिचे पालक विद्यालयाच्या स्थानिक स्कूल समितीचे सदस्य असून राहाता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवक आहेत.अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री. सुधीर मोरे यांनी दिली.
तिला विद्यालयाचे शिक्षक सर्वश्री प्रमोद काळे, संदीप आहेर, अमोल म्हस्के, संभाजी आव्हाड इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. खा.डॉ. सुजय दादा विखे पाटील, शाळेच्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे पाटील, संस्थेच्या सीईओ डॉक्टर सुष्मिता विखे पाटील, ॲडिशनल सीईओ श्री.हिरेमठ सर शिक्षण संचालिका सौ.सरोदे मॅडम इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११