पुणे / प्रतिनिधी:
दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे महानगर पालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे यशदा चे अतिरिक्त संचालक शेखर गायकवाड यांचे शुभहस्ते व पुणे मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली व आशा राऊत (उपायुक्त शिक्षण) पुणे मनपा आणी सुनंदा वाखारे (शिक्षण प्रमुख प्राथ.) पुणे मनपा यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पुणे मनपा शाळा क्र. ९९ जी, वडगांवशेरी, पुणे येथील उपशिक्षिका सौ. सोनाली सोमनाथ शिवले यांना पुणे महानगर पालिकेच्या वतीने मानपत्र, सन्मानचिन्ह व टॅब देऊन "पुणे मनपा आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२४" ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर सहाय्यक शिक्षण प्रमुख एम.आर. जाधव, विजय आवारी, तुळापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पवन खैरे, गणेश पुजारी, राजाराम शिवले, पुणे जिल्हा आदर्श विषयतज्ज्ञ सोमनाथ शिवले, आदर्श शिक्षक दत्तात्रय गायकवाड, डॉ. अस्मिता बहिरट, प्रा. किशोर फडतरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११