शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी येथील श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या धुळे जिल्ह्यातील पत्रकारांचा श्री खंडोबा मंदिर प्रमुख संदीप मनोहर नागरे यांनी स्नेह वस्र फोटो प्रतिमा प्रसाद श्रीफळ पुष्प देऊन सत्कार केला.
याप्रसंगी श्री खंडोबा मंदिराचे प्रमुख संदीप नागरे यांनी आलेल्या सन्माननीय पत्रकारांना या मंदिराविषयी माहिती देत श्री साईबाबांचे प्रथम या मंदिरातच आगमन झाल्याची माहिती दिली. याप्रसंगी धुळे जिल्हा दैनिक दवंडीचे उपसंपादक अनिल देसले,साक्री तालुका व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष व नियोजित पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गवळी, व्हीओसी चे सदस्य अंबादास बेनुस्कर प्रमोद बोरसे व शिर्डी येथील पत्रकार संजय महाजन, सुनील मांजरेकर आदी उपस्थित होते.