shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एरंडोल येथे तहसीलदार पदी यांनी स्वीकारला पदभार..

पुरवठा निरीक्षक अधिकारी संदीप निळे यांची ही बदली.

प्रदीप रमेश पाटील
 नवनियुक्त तहसीलदार प्रदीप रमेश पाटील..


एरंडोल : येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांची बदली झाली असून त्यांच्या रिक्त पदावर प्रदीप रमेश पाटील यांनी कामकाजाची सूत्रे स्वीकारली.प्रदीप पाटील हे यापूर्वी नगर येथे जिल्हा अधिकारी कार्यालयात तहसीलदार पदी कार्यरत होते त्यांची तेथून एरंडोल येथे बदली झाली आहे. त्यांची एकूण १६ वर्ष सेवा झाले आहे. तसेच अमळनेर, चांदवड या ठिकाणी सुद्धा ते तहसीलदार पदी कार्यरत होते. 

       नवनियुक्त तहसीलदार प्रदीप पाटील यांचे मूळ गाव म्हळसर तालुका शिंदखेडा हे आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून सातबारा दुरुस्ती फेरफार नोंदी यासारख्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


         पुरवठा निरीक्षक अधिकारी संदीप निळे यांची अकोले तालुका नगर येथे बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर विवेक वैराळकर यांची बदली झाली आहे. ते यापूर्वी जामनेर येथे कार्यरत होते. वैराळकर यांनी कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचा कार्यालयीन कर्मचारी वृंदा तर्फे स्वागत करण्यात आले तर बदली झालेल्या अधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला.

close