श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, स्टेट बोर्डमध्ये शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, माजी प्राचार्य शिवाजीराव बारगळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. प्रसंगी इ. दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन सत्कार केला. दरम्यान कु.अक्षदा दळे हिने कविता सादर केली, तर संगीत शिक्षक दिपक वाघ यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे गीत सादर केले. तसेच इ. दहावीतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत, शिक्षकांचे मनोरंजनपर खेळ घेतले. व उपस्थित विद्यार्थी- शिक्षकांची मने जिंकली. प्रसंगी शिक्षक दिनाच्या द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापनाचे काम हाती घेतले व सुरळीत पार पाडले. कार्यक्रमाचे आयोजन- नियोजन इ. दहावीतील विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इ.दहावीतील सर्वच विद्यार्थी व वर्गशिक्षिका राजश्री तासकर व मंगेश साळुंके यांनी कठोर परिश्रम घेतले. .
यावेळी कार्यक्रमास चेअरमन टी.ई.शेळके, व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, माजी प्राचार्य शिवाजीराव बारगळ, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.वेदिका दायमा, कु.संजीवनी गाडेकर यांनी केले, तर आभार कु.गायत्री महांकाळे हिने मानले.
*वृत्त विशेष सहयोग
शंकरराव बाहुले (सर) श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११