श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगांव येथील
मतमाउली यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही संत तेरेजा क्लब हरिगांव यांचेवतीने दि १५ व १६ सप्टे.रोजी भव्य पुरुष गट कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती क्लब अध्यक्ष बी.सी. मंडलिक यांनी दिली. कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक संचालक अ.जि.म.स.बँक करण ससाणे,म.प्र.कॉंग्रेस सरचिटणीस हेमंत ओगले,व रवी गायकवाड जि. सरचिटणीस कॉंग्रेस यांच्या वतीने रु ३१०००/-ठेवण्यात आले आहे., व्दितीय रु २१०००/- दिलीप मढीकर, अशोक गायकवाड, चांगदेव बोधक,मिलिंद गडवे यांचेतर्फे, तृतीय रु १५०००/- उद्योजक प्रवीण आव्हाडतर्फे,चतुर्थ रु ११०००/- अशोक पारखे यांच्यातर्फे, पाचवे रु ७०००/- संपत डुकरे तर्फे,सहावे रु ७०००/- अशोकराव जाधवतर्फे, सातवे रु ५०००/- ग्लोरिया व गोल्विन पवार तर्फे,आठवे रु ५०००/- शामराव राठोडतर्फे, उत्कृष्ट रायडर रु १०००/- अमोल शिंदेतर्फे, उत्कृष्ट खेळाडु रु २०००/- प्रभाकर बोरगेतर्फे,अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.स्पर्धा शुभारंभ दि १५ सप्टे.रोजी प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ,व सहकारी धर्मगुरू,,आदींच्या हस्ते होणार आहे.बक्षीस वितरण सोहळा करण ससाणे. हेमंत ओगले,फा. डॉमनिक रोझारिओ, संगीताताई गायकवाड आदी मान्यवरांचे उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धकांनी दि १५ सप्टे.रोजी सकळी ८ वा.करावी. मो.क्र ०९८५०९१६३९६, ८८०५७४८३९६,९९२२७८०६९९,९५६१३२२१२२५ वर संपर्क साधावा असे आवाहन क्लब अध्यक्ष बी. सी. मंडलिक,उपाध्यक्ष डी. एस. गायकवाड,सुनील साठे, किशोर कदम,अशोक त्रिभुवन,रमेश गायकवाड, गुलाब लोखंडे,रवी गायकवाड, अनिल भनगडे, सुभाष पंडित आदींनी केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११