shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कमलाभवानी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने भव्य आराधी गीत स्पर्धाचे आयोजन


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २६/ करमाळ्याची कुलस्वामिनी आई जगदंबा कमला भवानी शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्यावतीने आराधी गीत स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी दिली आहे. आपण करमाळा तालुक्याचा सुपुत्र एक आईचा भक्त म्हणून सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आई कमला भवानीची भक्त असलेल्या आराधी लोकांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी आम्ही प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने दिनांक ०४ ऑक्टोंबर ते ०९ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ०४ वाजेपर्यंत, अर्थव मंगल कार्यालय, श्रीदेवीचा माळ, करमाळा येथे भव्य आराधी गीत स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी  करमाळा तालुक्यातील आराधी मंडळे, आराधीची गाणी गाणारे गायक तसेच सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आई श्री कमलाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये भाग घेऊन या स्पर्धेमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे. व आपल्या सांस्कृतिक शारदीय महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर ‌व सचिवा मायाताई झोळ मॅडम यांनी केले आहे.

आराधी गीत स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी  ९९२१४७४५२० // ९४०५३१४२९६ या क्रमांकावर नाव नोंदणी ‌ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
close