shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विध्यार्थ्यांनचे तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत घवघवीत यश.

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विध्यार्थ्यांनचे तालुकास्तरीय खो खो  स्पर्धेत घवघवीत यश.
    इंदापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य ,अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय खो खो  स्पर्धा या श्री  केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी* या प्रशालेमध्ये घेण्यात आल्या होत्या. यामध्ये तालुक्यातून विविध शाळेतील विद्यार्थीचा सहभाग होता त्यामध्ये वयोगट 14 वर्षे, वयोगट 17 वर्षे,वयोगट 19 वर्षे मुलं व मुली सहभागी  झाले होते. यामध्ये तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी या शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय  डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. श्रीमंत ढोले सर यांनी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली त्या संस्थेत विद्यार्थी जीवनात असणारे खेळाचे महत्व जपले जाते हे समजून विद्यार्थ्यांना खेळासाठी आवश्यक असणारे भव्य क्रीडांगण, खेळासाठी लागणारे सर्व साहित्य, क्रीडा शिक्षक उपलब्ध करून दिले शिवाय विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्व सांगत असताना त्यांनी सांगितले की, खेळामुळे विद्यार्थ्यांचे धैर्य वाढते, शिस्त लागते, गटामध्ये काम करणे, वेळेचे बंधन पाळणे आत्मविश्वासाची पातळी उंचावणे, तसेच शारीरिक तंदुरुस्ती राहते , *निरोगी शरीरात निरोगी मन वास करते, चांगले आरोग्य हे शारीरिक खेळामुळेच प्राप्त होत असते* विद्यार्थ्यांच्या शरीराला व मेंदूला निरोगी ठेवण्याचे काम संस्था करत  आहे असे सांगितले, विद्यार्थ्यांनीही खेळामध्ये व त्यांच्या सरावांमध्ये सातत्य व नियमितपणा ठेवावा असा मोलाचा सल्ला दिला .
विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करून स्वतःचा व संस्थेचा  नावलौकिक करावा असा आशावाद व्यक्त केला .
 विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या 
 उपाध्यक्षा सौ.श्री.चित्रलेखा ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार व माजी गट शिक्षणाधिकारी श्री. प्रदिपजी गुरव साहेब विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार,  प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर , शिक्षक यांनी अभिनंदन करत  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांना मार्गदर्शन करणारे श्री. गणेश काळे सर ,यांचेही अभिनंदन तसेच क्रीडा विभाग प्रमुख प्रशिक्षक 
श्री. शिवराज तलवारे सर, श्री.अविनाश कोकाटे सर यांचेही अभिनंदन केले
close