श्रीरामपूर / प्रतिनिधी:
इतरांची वाट लावणारांना चांगल्या वाटेवर लावणारे देव रूपी संत आपल्या परीसरात आहेत, ते खर्या अर्थाने देव आहेत. ज्यांना ब्रम्हदेव पहायचा असेल त्यांनी एकदा देवगडला या बाबांना डोळे भरून बघा देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच त्यांना शांती:ब्रम्ह असे संबोधले जाते. आध्यात्मात जेव्हढी साधु संताची व देवांचे लक्षणे लक्षणे सांगीतले आहेत त्या ही पलीकडचा देव अवतार म्हणजे श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती महंत, गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज हे आहेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील होणारा उत्सव व त्यात सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभले म्हणजे आपण ही सर्वजण भाग्यवंत आहोत असे प्रतिपादन श्री माऊली वारकरी गुरूकुल आश्रमाचे संस्थापक रामेश्वर महाराज पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी श्रीक्षेत्र आंबेजोगाई येथील मुकूंदराज स्वामी संस्थान अध्यक्ष व गणेशखिंड देवस्थानचे विश्वस्त किसन महाराज पवार, कृष्णा महाराज वाघुले, संदिप महाराज जाधव, लक्ष्मण महाराज नांगरे, सचीन महाराज पवार, निवृत्ती महाराज विधाटे, परमेश्वर महाराज भारत, अशोक कारखाण्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळूंके, माजी व्हा. चेअरमन दत्तात्रय नाईक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव पटारे, देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा, सचिव बजरंग दरंदले, विश्वस्त दत्तात्रय पवार, कल्याणराव लकडे, शिवाजी पवार, भाऊसाहेब कोकणे आदिंसह मान्यवर व्यासपिठावर उपस्थीत होते.
श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे सुरू असलेल्या वरद गजानन उत्सव सोहळ्याप्रसंगी किर्तनरूपी सेवेतरामेश्वर महाराज पवार समवेत किसन महाराज पवार, कृष्णा महाराज वाघुले, संदिप महाराज जाधव, लक्ष्मण महाराज नांगरे, सचीन महाराज पवार, निवृत्ती महाराज विधाटे, परमेश्वर महाराज भारत, महेश महाराज, बाळासाहेब ओझा, बजरंग दरंदले, दत्तात्रय पवार, कल्याणराव लकडे, शिवाजी पवार आदिंसह मान्यवर व भजनी मंडळ दिसत आहे.(छाया - भानुदास बेरड)
किर्तनं हे पांडुरंगा पुढे होत असतात मात्र श्रीक्षेत्र देवगडच्या बाबांनी श्री दत्तात्रेयांना पांडूरंग केले व गणपती बाप्पानांही पांडूरंग केले म्हणूनच येथे असा हा भव्य सोहळा बघावयास मिळत आहे. श्रीक्षेत्र गणेशखिंड देवस्थान विश्वस्त मंडळाचा कारभार व परीसरातील भाविकांची नितांत श्रद्धा यातून संपन्न होत असलेला हा सोहळा अवघ्या महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे. सर्व इंद्रीयांना एकाच वेळी सुखी करणारा सर्वगुण संपन्न असा तो एकमेव परमेश्वर आहे. संत आपल्याला देवदर्शनाचे ज्ञान देण्याचे काम करतात हा सुख प्राप्तीचा मार्ग आहे, केवळ देवगडच्या बाबांच्या आशिर्वादामुळे आमच्याकडील ३५० अनाथ मुलांना सांभाळण्याची शक्ती आम्हाला प्राप्त झालेली आहे हे केवळ बाबांच्या आशिर्वादामुळेच शक्य आहे असे प्रतिपादन यावेळी अनाथांची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांनी सांगीतले.
यावेळी अशोकचे माजी संचालक रामदास पटारे, भागवतराव चितळकर, शनैश्वर पवार, साहेबराव पटारे, नानासाहेब पारखे, विठ्ठलराव होन, मच्छींद्र काळे, रामभाऊ कवडे आदिंसह मोठा जनसमुदाय उपस्थीत होता. आज येथे कारेगांव येथील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव पटारे, टाकळीभान येथील मदन माने व बेलापूर येथील दिनेश वैष्णव यांनी महाप्रसादाचे अन्नदान केले.
श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे सुरू असलेल्या वरद गजानन उत्सव सोहळ्याप्रसंगी किर्तनरूपी सेवेत रामेश्वर महाराज पवार समवेत आदिंसह मान्यवर, उपस्थीत जनसमुदाय व भजनी मंडळ दिसत आहे.(छाया - भानुदास बेरड)
श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे सुरू असलेल्या वरद गजानन उत्सव सोहळ्याप्रसंगी किर्तनरूपी सेवेत रामेश्वर महाराज पवार दिसत आहेत. (छाया - भानुदास बेरड)
वृत्त सहयोग:-
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे
*समता न्युज सर्व्हिसेस, श्रीरामपूर