एरंडोल प्रतिनिधी :-एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे उप जिल्हा प्रमुख राजेंद्र दोधू चौधरी व शहर प्रमुख आंनदा रामदास चौधरी (छोटू भगत) यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेना राज्य सचिव संजय मोरे व जिल्हा शिवसेना प्रमुख वासुदेव पाटील यांना पाठविला आहे.
उभयतांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यात राजकिय शेत्रात खळबळ माजली आहे पक्षाच्या बैठकीत आपल्याला वेळोवेळी आमंत्रित केले जात नाही विश्वासात घेतले जात नाही त्यामुळे राजीनामा दिल्याचे उभयतांनी सांगितले. विशेष हे की दोघही पदाधिकारी आमदार चिमणराव पाटील यांच्या सोबत पहिल्यापासून त्यांची भुमिका हि आबांना बंड खोरीच्या वेळेस पहिल्या फळीच्या कार्य करता व खंदे समर्थक म्हणून तालुक्यात ओळखले जातात.
त्यांनी विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर असतांना दोघं मान्यवरांनी पक्षाचा दिलेला राजीनामा आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांना मोठा राजकिय झटका असल्याचे सुर राजकिय गोटातून उमटत आहे राजेंद्र चौधरी यांचा मागे ओ.बी.सी. समाजाच्या कार्य कर्त्यांची मोठी फळी आहे.
तसेच लवकरच आपण आपली पुढील राजकिय वाटचाल शेकडो कार्यकर्त्यांसोबत जाहीर करू अशे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले.