shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शेलगाव क चे प्रवीण वीर रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. 11   / गुरुवार दि. 5 सप्टेंबर रोजी यशदा पुणे येथे रेशीम संचालनालयाच्या वतीने रेशीम रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 7 जिल्ह्यातील 21 शेतकऱ्यांना रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 2022-23 मध्ये 1 एकरामध्ये सर्वाधिक उत्पन्न घेतलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक प्रवीण पांडुरंग वीर (11000/-रुपये), द्वितीय क्रमांक रामा पालवे (7500/- रुपये ), तृतीय क्रमांक विनोद केचे (5000/-रुपये) तसेच शाल, साडी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर, सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, राज्याचे कृषी संचालक सुनील बोरकर, जिल्हा रेशिम विकास अधिकारी पुणे चे संजय फुले, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, अधीक्षक अविनाश खडस व इतर अधिकारी उपस्थित होते.

रेशीम शेती ही अपारंपारिक व नावीन्यपूर्ण उद्योग असुनही प्रवीण वीर यांनी यश मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक  होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय फुले यांनी तर आभार रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी मानले.

2018 साली रेशीम व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अपयशही आलं. तालुक्यांमध्ये रेशीम व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार झालेला नसल्यामुळे मार्गदर्शनही मिळत नव्हते, परंतु जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर यांच्याशी जोडलो गेल्यानंतर आमच्या रेशीम व्यवसायाचा कायापालट झाला. जिल्हा रेशीम अधिकारी श्री विनीत पवार साहेब व त्यांचे सहकारी यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही भरघोस रेशिम उत्पन्न घेवू शकलो.
            *श्री प्रवीण पांडुरंग वीर*
close