शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने शिर्डी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रहार जीवनगौरव व प्रहाररत्न पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला असून या सोहळ्यात राजकीय, सामाजिक, वैद्यकीय तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना व महिलांना त्यांच्या उत्तुंग सामाजिक कार्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अनासपुरे व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या, सामाजिक कार्यात सहभागी असणारे योगेश तिय्या व त्यांची पत्नी माधुरी तिय्या, शिर्डी हे कुटुंब नेहमी सामाजिक क्षेत्रात गरजवंतांना मदतीसाठी धावून जाणारे हे कुटुंब शिर्डी सह परिसरात परिचित असून आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने शिर्डीतील हॉटेल साई संगम येथे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.