श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, स्टेट बोर्डमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी. जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांच्या हस्ते डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसंगी त्यांनी 'कर्मवीरांचे जीवन व त्यांचे शैक्षणिक कार्य, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमधून चि.सार्थक भाटिया (इ.दहावी) व सहशिक्षिका सुप्रिया बाबरस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, व्हा.चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे, राजश्री तासकर, सुनंदा थोरात तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
*वृत्त विशेष सहयोग
शंकर बाहुले (सर) श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११