श्रीरामपूर / प्रतिनिधी:
वाचन संस्कृती चळवळ चालविणारे साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये १९७७ पासून साहित्य चळवळीत सक्रिय आहेत.१९९० साली स्थापन केलेल्या साहित्य प्रबोधन मंच आणि२००६ साली वाचन संस्कृती प्रतिष्ठानद्वारे श्रीरामपूरात योगदान देत आहेत त्यांनी लिहिलेले' ग्रंथसंवाद' पुस्तक वाचन संस्कृतीला बळ देणारे असल्याचे मत आंतरभारती श्रीरामपूर शाखेचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील अतिथी कॉलनीतील समाज मंदिरात डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेल्या' ग्रंथसवाद' पुस्तकाचे वितरण आणि चर्चा उपक्रमात सुभाष लिंगायत बोलत होते. प्रथम डॉ. उपाध्ये यांनी पुस्तकाचा परिचय सांगून आजच्या काळात जेथे पुस्तके तेथे मस्तके घडतात. घरोघरी पुस्तकाचे देवघर असले पाहिजे. ज्यांच्या हाती पुस्तक त्यांचे भारी मस्तक ही संकल्पना विशद केली. सुभाष लिंगायत यांनी डॉ. उपाध्ये यांचे साहित्यिक योगदान सांगून आजच्या काळात ग्रंथसंवाद वाढला तरच वाचन संस्कृती टिकेल. आंतरभारती हेच कार्य करीत आहे असे सांगून पुस्तकाचे मूल्य विशद केले. यावेळी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा. शिवाजीराव बारगळ, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, जगन्नाथ वाघमारे,अरविंद वाणीसर, श्रीराम बोबडे, माजी तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली, आनंद मेळाव्याचे अब्दुल पठाण यांना ग्रंथसंवाद पुस्तक भेट दिले. आज वाचन संस्कृती विषयक चर्चा आणि प्रतिष्ठा वाढत असल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. डॉ. उपाध्ये यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगांव
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११