धुळे :- "आजवर ग्रामीण किंवा गावंढळ म्हणून नाकारलेल्या आपल्या बोलीतील शंब्दांना मानाचे स्थान येऊ घातले आहे. खान्देश अहिराणी बोलीतील समग्र लोकसाहित्याचा अभ्यास आग्रा येथील केंद्र शासनाच्या केंद्रीय हिन्दी संस्थान मार्फत खानदेशातील धुळ्याच्या विद्यावर्धीनी महाविद्यालयातील हिंदी विभाग संकलनाचे आणि त्याचे राष्ट्रभाषेत रुपातंर करण्याचे एक मोठे कार्य या प्रकल्पाच्या रुपाने पार पडत आहे. याच सार्थ अभिमान बोलीभाषिकांच्या अभ्यासकांना आहे.' असे उद्गार अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉ- रमेश सूर्यवंशी यांनी धुळे येथे विद्यावर्धीनी महाविद्यालयातील अहिराणी लोकसाहित्य संकलन व अनुवाद या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी काढलेत.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी हिंदी साहित्यिक डॉ उर्मिला पाटील, जळगाव, प्राचार्य डॉ मधुकर वानखेडे, उपप्राचार्य व कार्यशाळा संयोजक डॉ योगेश पाटील, डॉ.राजवीरेंद्रसिंग गावीत, प्रा. पंजाबराव व्यास तसेच कार्यशाळेला विषय तज्ञ म्हणून डॉ. अनील सूर्यवंशी चोपडा, डॉ. सविता चौधरी पारोळा, डॉ स्वाती शेलार एरंडोल व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बोली भाषेचा अभ्यास आवश्यक आहे. बोली भाषेत लपलेले सौंदर्य, जीवन उपयोगी ज्ञान याचा परिचय नव्या पिढीला होणे आवश्यक आहे. खान्देशी अहिराणी लोकसाहित्य हिंदी भाषेत अनुवादीत झाल्यावर त्याचा लाभ देशातील बोली भाषेचे अभ्यासक व समाजाला होईल असे प्रतिपादन डॉ. उर्मिला पाटील यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले.
आग्रा येथील केंद्रीय हिन्दी संस्थान भारतातील विविध बोलीच्या समग्र लोकसाहित्याचे संकलन व त्याचे राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी भाषेत रुपांतर करुन ते देश स्तरावर नेण्यासाठी विविध प्रकल्प राबवित असते. त्यातलाच एक भाग म्हणून खानदेशातील अहिराणी बोलीच्या समग्र लोकसाहित्याचे संकलन, वर्गीकरण आणि त्याचे हिंन्दी भाषेतील रुपातंर करण्याची जबाबदारी धुळे येथील विद्यावर्धीनी महाविद्यालयाच्या हिंन्दी विभागाला सोपविली आहे. या प्रकल्पासाठी अहिराणी बोलीचे संकलन व संपादनाची जबाबदारी अहिराणी बोलीचे संभाजीनंगर जिल्ह्यातील कन्नड स्थित जेष्ठ अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे कडे सोपविली असून प्रकल्पांतर्गत हिंदी भाषेतील संपादकाचे काम उपप्राचार्य व हिन्दी विभाग प्रमुख डॉ. योगेश पाटील हे पहात आहेत. हिन्दी रुपांतरासाठी मार्गदर्शक म्हणून हिंदी भाषेचे तज्ज्ञ जेष्ठ अभ्यासक जळगांवच्या डॉ उर्मिला पाटील या पहात आहेत. या प्रकल्पाअंतर्गत हिंदी रुपांतराचे काम पाहण्यासाठी चोपडा महाविद्यालयाचे डॉ. अनिल सूर्यवंशी, पारोळा महाविद्यायलाच्या डॉ सविता चौधरी, एरंडोल महिविद्यालयाच्या डॉ. स्वाती शेलार, आणि स्थानिक महाविद्यालयाचे डॉ- सुनिल पाटील हे पहात आहेत.
या प्रकल्पांतर्गतची ही कार्याशाळा गेली दोन दिवस महाविद्यालयात उदघाटनाच्या सत्रा व्यतिरिक्त विविध अशा चार सत्रात पार पडली. कार्यशाळेत गेल्या दिड महिन्यातील संकलनाचा, अनुवादाचा आढावा घेण्यात आला. येणाऱ्या अडचणी, काही शब्दांचे अर्थ व रुपांतर यावर विस्ताराने चर्चा करण्यात आली.
दोन दिवसीय चारही सत्रांचे अध्यक्ष स्थानी पुढील मान्यवर होते - लोकसाहित्य विशेषज्ञ डॉ उर्मिला पाटील, डॉ रमेश सूर्यवंशी, डॉ. योगेश पाटील, डॉ- सदाशिव सूर्यवंशी. सदर प्रकल्पासाठी खानदेशच्या अहिराणी साहित्याचे अभ्यासक श्री. रमेश बोरसे, प्राचार्य डॉ.संजीव गिरासे, श्री. सुभाष अहिरे, श्री. विश्राम बिरारी, डॉ. योगीता पाटील, डॉ. पंढरीनाथ पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे
कार्यक्रमाची सुरवात प्रा. उज्वला वाणी यांच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक डॉ योगेश पाटील यांनी केले.आभार प्रा. डॉ मंजू तरजेडा व सुत्र संचलन प्रा. सुनील पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजेंद्र पाटील, प्रा.हेमंत पाटील व हिंदी भागातील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.