श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जीवनात रावसाहेब शिंदे, डॉ.अण्णासाहेब शिंदे, ऍड.
पी.बी. कडू पाटील, दादा पाटील राजळे अशी आदर्श माणसे भेटली म्हणून शिक्षक होण्यात धन्यता वाटली. याच विचारांचा वसा आणि वारसा जपणारे विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला ही माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद घटना असल्याचे गौरवोदगार पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर जयवंतराव टेमकर यांनी काढले.
येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारल्यानतर प्राचार्य डॉ. टेमकर बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय अ .नगर हे उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रकाश मेहकरकर, सौ. संगीता टेमकर, सुखदेव सुकळे, डॉ. शिवाजी काळे उपस्थित होते. भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रसन्न धुमाळ यांनी दिली व मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांचा मानपत्र, गौरवचिन्ह,शाल, बुके, पुस्तके देऊन पाहुण्यांनी सत्कार केला तर सौ. सुरेखा बुरकुले यांनी सौ. संगीता टेमकर यांचा सत्कार केला. यावेळी डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे, काशिनाथ गोराणे , सुदामराव औताडे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुणे डॉ. वसंतराव जमधडे यांनी सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांचे मोठेपण सांगून या शिक्षकदिनी सेवाभावी, प्रामाणिक, कष्टातून पुढे आलेल्या प्राचार्य डॉ. टेमकर यांना सन्मानीत केल्याबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक केले. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी माणसेच माणसांचे मोठेपण जाणतात. त्यासाठी चांगल्याला चांगलं म्हणण्याची मानसिकता हवी अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी काळे यांनी केले तर सुदामराव औताडे पाटील यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगाव
*सहयोगी*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११