शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
*न्याहाळोद ता.जि.धुळे येथील आदर्श कंट्रोलर पुरस्कार प्राप्त फी संतोष दामू सैंदाणे यांचे चिरंजीव धुळे येथील आय.टी.आय येथील आदर्श शिक्षक दिनेश संतोष सैंदाणे यांनी सन २०२४ रोजी लोकसभा मतदारसंघात नोंदणी व मतदार जनजागृती केली.त्यामुळे दहा टक्के मतदानाची टक्केवारी निवडणुकीच्या कालावधीत वाढली.त्यामुळे अतिउत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र, रोख पारितोषिक देऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय आयकॉन व मास्टर ट्रेनर पुरस्कार देण्यात आला.त्यावेळी मा.गिरीश जी महाजन, जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र पापळकर,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशालजी नरवाडे साहेब, उपनिवासी जिल्हाधिकारी नितीन गवांडे साहेब, निवडणूक निर्णय अधिकारी गंगाराम तळपाळे, प्राचार्य चकोर साहेब, उपप्राचार्य प्रकाश सातपुते, सल्लागार आर.पी पगारे, रजिस्टर आर.आर सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
*त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आदिवासी विकास संघाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.त्यावेळी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, युवा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, धुळे तालुका संपर्कप्रमुख दिलीप शिरसाठ,संतोष सैंदाणे, सुनील पुराणिक,रवींद्र चव्हाण,दगा कोळी,निंबा शिरसाठ, संजय शिरसाठ,पृथ्वीराज शिरसाठ, उदय शिरसाठ सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.*