shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.**जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेच्या उपाध्यक्षा  सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.*
इंदापूर: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
 प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या उपाध्यक्षा  सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
 *ही स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.*
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचे उज्वल भविष्य घडावे, आदर्श पिढी निर्माण व्हावी, उत्तम वक्ता हा शालेय जीवनापासूनच घडत असतो म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
*स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आलेली आहे.*

*लहान गट* इयत्ता पहिली ते चौथी
*विषय*-1)सांग सांग भोलानाथ आईचा मोबाईल हरवेल काय?
2) मला घडवते माझी शाळा.
3 )माझी आई माझा गुरु.
4)संतांची शिकवण.

*मध्यम गट* इयत्ता पाचवी ते सातवी
*विषय*
1) शिवरायांची शिकवण. 
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण.
3) सुविधा नको संस्कार द्या. 
4) माझी सावित्री.

*मोठा गट* इयत्ता आठवी ते बारावी 
*विषय* 
1)देशभक्ती की धर्म भक्ती. 
2)हे विश्वचि माझे घर.
3)स्त्रियांना हवे काय?
3)हे जीवन सुंदर आहे.
*इत्यादी विषयावर गटानुसार स्पर्धा होणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, JBVP चषक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनाही आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल.*
*विजेत्यांना खालील प्रमाणे पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.*
*लहान गट* इयत्ता पहिली ते चौथी 
*प्रथम क्रमांक*-1001रु चषक व प्रमाणपत्र
*द्वितीय क्रमांक*-701रु चषक व प्रमाणपत्र
*तृतीय क्रमांक*-501रु चषक व प्रमाणपत्र
*उत्तेजनार्थ क्रमांक* 1)501 रु प्रमाणपत्र 
2)501रु व प्रमाणपत्र

*मध्यम गट* इयत्ता पाचवी ते सातवी
*प्रथम क्रमांक* 3001रु चषक व प्रमाणपत्र
*द्वितीय क्रमांक*- 2001रु चषक व प्रमाणपत्र
*तृतीय क्रमांक*- 1001रु चषक व प्रमाणपत्र
*उत्तेजनार्थ क्रमांक* 1)501रु प्रमाणपत्र 
2)501रु प्रमाणपत्र 

*मोठा गट* इयत्ता आठवी ते बारावी 
*प्रथम क्रमांक*-5001रु चषक व प्रमाणपत्र 
 *द्वितीय क्रमांक*- 3001रु चषक व प्रमाणपत्र
*तृतीय क्रमांक*- 2001रु चषक व प्रमाणपत्र
*उत्तेजनार्थ क्रमांक* 1)501रु प्रमाणपत्र 
2)501रु प्रमाणपत्र

*स्पर्धेमध्ये सहभाग विनामूल्य आहे. नाव नोंदणीसाठी दिनांक 4 ऑक्टोंबर दुपारी 2 वाजेपर्यंत 9860058081,9890137827 या क्रमांकावर संपर्क करावा.*
close