shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आ.नमिता मुंदडाच्या प्रयत्नातून चिंचोलीमाळी विद्युत उपकेंद्राला 5 एमव्ही एचा ट्रान्सफॉर्मर मंजुर..!!

प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी:-                               
केज विधानसभेच्या आमदार नमीता अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नातून चिंचोलीमाळी येथील विद्युत उपकेंद्रासाठी नवीन 5 एमव्हीएचा  ट्रान्सफॉर्मर मंजुर झाला असुन यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत 1 कोटी,70 लाख,55 हजार 350 रूपयांचा निधी मंजुर झाल्याचा व तांत्रिक मान्यता दिल्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत.सदरचा ट्रान्सफॉर्मर आर डी एस एस योजनेतून मंजूर आहे .लवकरच टेंडर निघणार आहे त्यापूर्वीच डी पी डी सी मधून मंजूरी दिली आहे. 



चिंचोलीमाळी उपकेंद्रातुन  शेतीपंपासाठी तीनही फीडर वरुन आळीपाळीने पाच तास विजपुरवठा केला जात होता.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी पुरेसा विजपुरवठा होत नव्हता.व त्यामुळे गावठाणातील विजेचे भारनियमन करावे लागत होते.त्यामुळे केज विधानसभेच्या आमदार नमीताताई अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024 - 25 अंतर्गत 1 कोटी,70 लाख,55 हजार,350 रूपये खर्चाच्या  5 एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर मंजुर करण्यात आला आहे.त्यासंबंधिची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली असुन हे काम लवकरच सुरू होणार आहे.

या 5 एमव्हिएच्या ट्रान्सफॉर्मर मुळे चिंचोलीमाळी विद्युत उपकेंद्रातुन तीनही फिडरवरुन शेतीपंपासाठी एकाच वेळी आठ तास
अखंडीत विजपुरवठा होणार आहे.व गावठाणात करण्यात येणारे भारनियमन ही बंद होणार आहे.

यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी अखंडीत विज पुरवठा करण्यात येणार आहे.त्यामुळे आमदार नमीताताई अक्षय मुंदडा,भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,युवा नेते अक्षय मुंदडा यांचे
 
यांचे जेष्ठ नेते सुनिलआबा गलांडेपाटील, जेष्ठ नेते रामकृष्ण घुले काका ,चेअरमन अरुणतात्या काळे, उपसरपंच धिरजराव वनवे, व्हाईस चेअरमन आबासाहेब केदार, डोक्याचे सरपंच गोरख भांगे, माजी सरपंच बापुराव भांगे, हातगाव चे उपसरपंच श्रीराम वायबसे, केवडचे सरपंच बाळासाहेब सत्वधर, चेअरमन गणेश सपाटे ,टाकळी चे माजी सरपंच रघुनाथ बारगजे, दगडु दळवे, दिलीप गायकवाड, रविंद्र गलांडे, राजाभाऊ नखाते, चंद्रकांत भुजबळ, मेजर हनुमंतराव वायबसे, गणेश वायबसे, भागवत वायबसे, बी. जी. गदळे, वैभव केंद्रे, अनंत कऱ्हाड, महादेव गिते, चत्रभूज वनवे, शरद कोल्हे , व्यंकट बारगजे, मुकादम गोरख बारगजे, मुकादम रघुनाथ बारगजे, जिवन बारगजे, सुरज घुले, राम घुले, प्रकाश बारगजे, विक्रम घुले, भागवत घुले, चंद्रकांत घुले यांच्याढसह चिंचोली (माळी) सारुकवाडी, डोका, हादगा़व, केवड व टाकळीच्या ग्रामस्थांनी आभार मानले अभिनंदन केले आहे.
close