shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आ. संजयमामा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून 77 वर्षांनी ग्रामस्थांना मिळाला अधिकृत रस्ता

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २३/ प्रयत्नाबरोबरच कामाला विश्वासाची जोड असली की यश आपोआप मिळतेच याचा प्रत्यय शेरेवस्ती, देवळाली येथील रस्त्याच्या कामात दिसून येत आहे. शेरेवस्ती येथे जवळपास 700 ते 800 लोकसंख्या आहे या वस्तीला गावातून जाण्या - येण्यासाठी अधिकृत रस्ता स्वातंत्र्यपूर्व काळापासून नव्हता, परंतु देवळालीचे माजी सरपंच आशिष आण्णा गायकवाड व त्यांच्या ग्रामपंचायत टीमच्या प्रयत्नातून वनविभागाच्या विविध अटी, शर्ती पूर्ण करून हा रस्ता पूर्ण करण्याचा मानस हाती घेतला. ह्या रस्त्याचे काम सुरू झाले असून ८ दिवसांमध्ये सदर रस्ता ग्रामस्थांना जाण्या - येण्यासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे. सदर रस्ता पूर्ण करण्यासाठी ४ वर्षापासून पाठपुरावा चालू होता.

करमाळा - माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा वनाधिकारी श्री. धैर्यशील पाटील व त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले. ग्रामपंचायत देवळालीच्या वतीने वेळोवेळी वनाधिकारी सोलापूर, वनविभाग मोहोळ, वनविभाग भोर, करमाळा तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय कुर्डुवाडी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याचे फलित आज मिळाले. रस्त्याचे काम चालू झाल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सदर काम पूर्ण करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी श्री‌. धनंजय शिंदे, माजी सरपंच श्री गहिनीनाथ गणेशकर, उपसरपंच प्रतिनिधी श्री रामचंद्र कानगुडे, चेअरमन श्री रामचंद्र रायकर, ग्रा. प. सदस्य श्री पोपट बोराडे, श्री प्रकाश कानगुडे, श्री संजय चौधरी त्याचबरोबर चेअरमन श्री संजय कानगुडे, श्री बापू गुंड, श्री बंडु काका शेळके यांनी विशेष प्रयत्न केले. शेरेवस्ती, देवळाली ग्रामस्थांमधून कार्यकुशल आमदार श्री संजयमामा शिंदे, कर्तव्यदक्ष मा. सरपंच श्री आशिष आण्णा गायकवाड व त्यांच्या ग्रामपंचायत टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
close