shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

माऊली वृद्धाश्रमाचे कार्य कौतुकास्पद - माजी आ. भाऊसाहेब कांबळे


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा रोड वरील माऊली वृद्धाश्रमाचे कार्य  कौतुपास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
 सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त ज्योत - मशाल घेऊन येणाऱ्या पदयात्रेतील भाविक भक्त यांचे स्वागत माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले तसेच पदयात्रेतील भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था येथील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी करण्यात आली होती, प्रसंगी दिंडीतील प्रमुख कुणाल पंडित अजय लोणारी यांचा सन्मान श्री.कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

यावेळी माऊली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष वाघुंडे, सौ. कल्पना वाघुंडे परिवाराच्या वतीने श्री.कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष डहाळे, दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार राजेंद्र देसाई यांनी मानले.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close