चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी, इंदापूरचा आयपीआयएस व आयआयईआर पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार
इंदापूर, दि. १५ चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी यांचे बी फार्मसी व डी. फार्मसी या महाविद्यालयाचा पुणे येथील नामांकित संस्था आयपीआयएस व आयआयईआर यांच्यामध्ये नॉलेज शेरिंग आयपीआर प्रोटेक्शन, विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रोफेशनल ॲडोन कोर्सेस व फार्मा क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदलांची माहिती आदान प्रदान करण्यासंदर्भात हा करार महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी मागील वर्षापासून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी संस्था कार्यरत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता तसेच ग्रामीण व शहरी विध्यार्थी यांच्यातला गॅप भरून काढण्यासाठी वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस सुद्धा या करारांतर्गत शिक्षक व विद्यार्थी यांना उपयोगी पडणार आहेत.
ॲड संजय पांगरे निर्मित इन्टेलेक्तुल प्रॉपर्टी इन्टेलेक्त सर्विसेस, पुणे हि नामांकीत संस्था मागील बरेच वर्षे आयपीआर (इन्टेलेक्तुल प्रॉपर्टी राईट्स) प्रोटेक्शन साठी काम करीत असून बऱ्याच महाविद्यालयाबरोबर त्यांचा सामंजस्य करार असून त्यानुसार ते पेटंट, कॉपीराईट, इंडस्ट्रीअल डिझाईन, जिओग्रफिकल इंडीकेशन, ट्रेडमार्क मिळवून देण्याकरिता मदत करतात. तसेच या सर्व गोष्टींचे कमर्सियालायझेषण करण्यासाठी सुद्धा हि संस्था सपोर्ट करते. या सामंजस्य करारावर बी. फार्मसी व डी. फार्मसी प्राचार्य डॉ नेहा काजळे व कंपनीचे डायरेक्टर ॲड संजय पांगरे स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे ,सचिव श्री विलास भोसले तसेच बी. फार्मसी प्रमुख प्रा डॉ महेश जाधव तसेच डी. फार्मसी प्रमुख प्रियांका पारेकर इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.