shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कळंब येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न*

*कळंब येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न*
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील कळंब गावी, प्रविणभैय्या माने यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात असंख्य नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली. 

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या शिबिरात आत्तापर्यंत ८७२ लोकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली असून यापैकी ४२७ नागरिकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले असून १६ नागरिकांची पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रीया पार पडणार आहे. 

या शिबिरास भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, गेल्या ५ - ६ दिवसांत सर्वत्र नागरिकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे यानिमित्ताने श्री माने यांनी संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. 

या शिबिराचे आयोजन गणेश धांडोरे, विशाल वाघमोडे, संतोष कदम सर, अमोल चव्हाण यांनी केले होते तर निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर, डॉ. शरद शिर्के, तमन्ना मॅडम, डॉ. संतोष रणवरे यांनी या शिबिराचे नियोजन केले. 

तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजेश जामदार, गणेश धांडोरे, अमोल चव्हाण, संतोष कदम सर, विशाल वाघमोडे, समाधान माळशिकारे, सागर डोंबाळे पाटील, सोमनाथ पवार, महेश डोंबाळे पाटील, विजय महाडिक, पांडुरंग जगदाळे, ओम चव्हाण, विशाल जाधव, आदित्य कांबळे, सुजित पाटील, सिद्धार्थ मोरे, विशाल भोसले, वैभव करवले, रोहन बनसोडे आदी मान्यवर आणि पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
close