कोणाची होणार बोलती बंद ?
आमदार शिंदे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल ...
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २८/ करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (सोमवारी) अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मध्यमप्रतिनिधीने केलेल्या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले, ‘मी विकास कामांवर निवडणूक रिंगणात उतरलो आहे. पुढेही विकास करायचा आहे. मी कधीही खोटी आश्वासने देत नाही आणि पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे विकास कामाबाबत बोलण्याची माझी कधीही तयारी आहे’, असे म्हणत त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारले आहे.
करमाळा विधासनभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार शिंदे यांनी आणलेल्या विकास कामांबाबत प्रश्न करत समोरासमोर बसून चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. ते आव्हान आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वीकासले असून विकास कामांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे.
आमदार शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आज (सोमवारी) साधेपणाने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे, विलास पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ, विटचे उदय ढेरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, सामाजिक कार्यकर्ते विवेक येवले, मानसिंग खंडागळे, युवराज गपाट, चंद्रहस निमगिरे, सरपंच रवींद्र वळेकर, अशपाक जमादार, कन्हैयालाल देवी, माजी नगरसेवक प्रवीण जाधव, सावडीचे श्री. शेळके, केशव दास आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी यावेळी कडक बंदोबस्त ठेवला होता.