shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एल.जी बनसुडे विद्यालयाचे जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश*

**एल.जी बनसुडे विद्यालयाचे जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश* 
इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर )येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल . जी बनसुडे विद्यालयातील विभाग स्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत एम.आय.टी कॉलेज येथे झालेल्या स्पर्धेत आनंद विठ्ठल वाघमारे याने 19 वर्ष मुले (91 किलो) या गटात प्रथम क्रमांक तसेच  प्रसाद विनोद बनसुडे याने 14 वर्ष वयोगट (34 किलो)वजनी गटात उत्कृष्ट कौशल्य सादर करत प्रथम क्रमांक मिळवून या दोघांची विभाग स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली व सार्थक धोंडीबा बनसुडे 14 वर्ष मुले (34 किलो )या गटात तृतीय क्रमांक मिळवून सहभाग झाला तसेच 
दादासाहेब हरिभाऊ पाटील शिक्षण संस्था नेवासा फाटा नेवासा जि.अहमदनगर येथे झालेल्या विभाग स्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत एल जी बनसुडे विद्यालया मधील तनुज संदिप ढवळे याने 19 वर्ष मुले( 73 किलो )या  गटात उत्कृष्ट कामगिरी करून तृतीय क्रमांक मिळवला व  जगदीश भारत तोंडे 19 वर्ष ( 60 किलो) समीर नवनाथ बनसुडे 19 वर्ष (45 किलो )सृष्टी भारत बनसुडे 19 वर्ष( 36 किलो) या विद्यार्थ्यांचा सहभाग झाला.त्या बद्दल विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक रुपेश भालेराव व सतिश बनसुडे यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) बनसुडे ,उपाध्यक्ष श्री शितल कुमार कार्याध्यक्षा सौ नंदाताई बनसुडे ,सचिव श्री नितीन बनसुडे, प्राचार्या सौ.वंदना बनसुडे ,मुख्याध्यापक श्री राहुल वायसे  व सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
close