shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अमळनेर मधील महत्वाच्या रस्त्यांसाठी मंजूर पाच कोटींची विकास कामे - मंत्री अनिल पाटील

शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश.

अमळनेर मधील महत्वाच्या रस्त्यांसाठी मंजूर पाच कोटींची विकास कामे - मंत्री अनिल पाटील


अमळनेर -,येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून महत्वपूर्ण रस्ट्यांसह इतर विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

       सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती सुधार योजनेतून ही कामे मंजूर झाली आहेत.यात प्रामुख्याने अत्यंत दुरवस्था झालेल्या रेल्वे उड्डाण पुल ते बंगाली फाईल कडून विप्रो कंपनी कडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश असल्याने या परिसरासह बोरी काठच्या गावांची सोय होणार आहे.तसेच बस स्टँड शेजारील अंत्यंत दैनी अवस्था झालेला गांधी नगरचा रस्ता आणि प्रताप महाविद्यालया जवळील रेल्वे उड्डाणपूल ते प्रोफेसर कॉलनी पर्यंतच्या रस्त्याचा समावेश असून याशिवाय अनेक भागातील.खुले भूखंड यातून विकसित केले जाणार आहेत.


प्रामुख्याने ही होणार कामे


अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. 11 मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे व चेकर्स टाईल्स बसविणे रक्कम 3069586/-,अमळनेर नगरपरिषद हद्दीतील गांधीनगरकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व संरक्षण भिंत बांधकाम करणे रक्कम 7055092/-,अमळनेर नगरपरिषद हद्दीतील आयडीबीआय बॅक ते पेट्रोल पंपपर्यत रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम 3949927/-

 एकुण रक्कम 14074605/-

तसेच अमळनेर नगरपरिषद हद्दीतील सानेगुरूजी उड्डानपुल ते प्रोफेसर काॅलनीपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रक्कम 7441885/

,अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रं.3 मध्ये रस्ता काॅक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे 5603691/-

तसेच अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग 8 मध्ये रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे 70,57149,सानेगुरुजी उड्डाणपूल ते बंगाली फाईल पर्यंत रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे 79,87767, मंगळनगर भागात खुला भूखंड उद्यान विकसित करणे 46,47645, गट क्रमांक 1373 मध्ये खुला भूखंड उद्यान विकसित करणे,28,21991 आदी कामांचा समावेश आहे.

      सदर विकास कामांना मंजुरी दिल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

close