shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरीच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी माजी विद्यार्थ्यांचा संरक्षण भिंतीसाठी आर्थिक सहाय्यातून पुढाकार.

वडापुरी: वडापुरी( ता- इंदापूर) येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विद्यालय वडापुरी या ठिकाणी विद्यालयाच्या उत्तर बाजू कडील संरक्षण भिंत बांधण्यासाठी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी शरद कामटे यांनी आर्थिक सहाय्य करून या विद्यालयात शिकणारे विद्यार्थी सुरक्षित राहावे यासाठी पुढाकार घेतला आणि आज त्यांच्या पत्नी सोनाली कामटे तसेच श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दत्तात्रय शिर्के, संचालक जनार्दन देवकर, उपाध्यक्ष राजेंद्र नलवडे, सचिव राजेंद्र पाटील, संचालक अरुण फडतरे, संचालक निवृत्ती शिर्के , संचालक नवनाथ बागल, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. तपासे, सहशिक्षक बी.एस पासगे, एच. एस. खताळ, सौ .ए. व्ही. शिर्के, सौ एस. बी. थोरात,सौ एस. एम. पवार, संदीप शिंगाडे, सौ दिपाली देशमुख, पि.के. शिर्के, एस. एच. मदने व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.
--करताना मान्यवर.
close